*शिंदखेडा (प्रतिनिधी : यादवराव सावंत)*
विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी शिंदखेडा शहरात विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले. आदिवासी एकता परिषद (शिंदखेडा), आदिवासी टायगर सेना, एकलव्य क्रांती सेना, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य आणि एकलव्य आदिवासी क्रांतीकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिंदखेडा शहर व तालुक्यातील हजारो आदिवासी समाजबांधव, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पारंपरिक वाद्यांच्या* *तालावर भव्य रॅली*
*रॅलीची सुरुवात* सकाळी १० वाजता वीर एकलव्य नगर, वरपाडा रोड येथून झाली. याप्रसंगी मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ वाढवून नगरपंचायतीचे माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शहरातून निघालेल्या या भव्य रॅलीने संपूर्ण शिंदखेडावासियांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीत पारंपरिक वाद्ये, डफ आणि डीजेच्या तालावर तरुण-तरुणी व महिलांनी आपल्या संस्कृतीप्रमाणे नृत्य केले. महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल हे देखील आदिवासी पारंपरिक वाद्ये व बोलीभाषेतील गाण्यांवर मनमुराद थिरकले.
सुमारे तीन तास चाललेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जात बिजासनी मंगल कार्यालय येथे पोहोचली, जिथे मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
*आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी व विकासासाठी कटिबद्ध* : पालकमंत्री जयकुमार रावल
बिजासनी मंगल कार्यालय येथे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले, "आदिवासी संस्कृतीचे जतन, समाजाचे संघटन आणि हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने देशभरात या दिनाचे आयोजन केले जाते."
आदिवासी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासावर भर देताना त्यांनी
*मोफत उच्च शिक्षण:* दोंडाईचा येथील 'नॉलेज सिटी कॉलेज'मध्ये आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी विविध उच्च शिक्षण अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
*आरोग्य क्षेत्रात संधी:* आदिवासी मुलींसाठी दोन वर्षांच्या नर्सिंग कोर्समध्ये संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.
*शबरी घरकुल योजना:* शहरात घरकुल योजना नसतानाही शबरी घरकुल आवास योजनेअंतर्गत शिंदखेडा शहरातील तब्बल ५५ आदिवासी कुटुंबांना एकाच वेळी घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे व नगरसेविका शितल सोनवणे यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याचे त्यांनी कौतुक केले.
*प्रमुख मान्यवरांची उपस्थिती*
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष उदय देसले, प्रकाश देसले,विदयमान गटनेत्या प्रतिनिधी चेतन परमार,पंचायत समितीचे माजी सभापती रणजीतसिंग गिरासे, माजी उपसभापती दीपक मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, वीरेंद्र आबा गिरासे, भायुमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चव्हाण, प्रवीण मोरे, अनिल गायकवाड,रवी जाधव,विष्णू ईशी, गटविकास अधिकारी श्रुती कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे,शहराध्यक्ष संजयकुमार महाजन नगरसेविका संगीता चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट,प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे,दादा मराठे,अबू कुरेशी, संदीप राजपूत यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती उपसभापती दीपक मोरे सर यांनी केले.तर सुरेश सोनवणे यांनी आभार मानले.
*नियोजनासाठी विशेष परिश्रम*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वार्ड क्रमांक २ च्या नगरसेविका शितल गुलाब सोनवणे, आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे यांच्यासह आप्पा सोनवणे,नाना कुवर, सुरेश सोनवणे,दीपक फुले, शामराव सोनवणे, पंडित फुले, व इतर पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.हयावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments