प्रतिनिधी l शिंदखेडा :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने तसेच माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, १३ ऑगस्ट २०२६ रोजी शिंदखेडा शहरातील प्रभाग (वॉर्ड) क्रमांक दोनमध्ये 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत भव्य शोभायात्रेचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले.
ही शोभायात्रा नगरसेविका शितल गुलाब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे व शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांच्या नेतृत्वात, तसेच गटनेत्या वंदना चेतन परमार, उपनगराध्यक्ष उदय देसले, सर्व सभापती व नगरसेवक-नगरसेविकांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणारा उपक्रमातून शोभायात्रेच्या प्रसंगी
शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये 'हर घर तिरंगा' अभियानात नागरिकांना संबोधित करताना भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन म्हणाले की जगात भारतीयांना ओळख देण्याची गरज नाही,तिरंगा झेंडा हिच आमची ओळख आहे. हे शक्य झाले ते फक्त विश्वविरू भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या प्रयत्नातूनच.तसेच वॉर्ड क्र. २ च्या नगरसेविका शितल गुलाब सोनवणे म्हणाल्या की,
"हर घर तिरंगा हा उपक्रम प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा आहे. भारतीय स्वातंत्र्य, अखंडता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज तिरंगा प्रत्येक नागरिकाने दि १३, १४,१५ ऑगस्ट रोजी आपल्या घरावर आदराने व अभिमानाने फडकवावा आणि या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे."
महिला, युवा वर्ग आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद
रॅलीची सुरुवात वॉर्ड क्रमांक दोनमधून झाली. देशभक्तीपर घोषणा आणि हातात राष्ट्रध्वज घेऊन निघालेल्या या शोभायात्रेने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. परिसरातील महिला, नागरिक आणि युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रमुख उपस्थिती :
या उपक्रमास शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, नगरसेविका शितल सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे, नाना कुवर, सुरेश सोनवणे, श्याम सोनवणे, दीपक फुले, दिलीप ठाकरे, राजेसिंग मालचे, रामदास मोरे, आनंद सोनवणे, वामन मोरे, अण्णा सोनवणे, प्रवीण मोरे, मुकेश फुले, धर्मा पवार, निलेश सोनवणे, सरस्वती भिल, कमलबाई भिल, रजूबाई फुले, सारिका सोनवणे, आक्काबाई भिल यांच्यासह परिसरातील शेकडो महिला, पुरुष व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments