नरडाणा : वरुड गावातून चोरीस गेलेली मोटारसायकल नरडाणा पोलिसांनी शोधून काढत आज मूळ मालकाच्या स्वाधीन केली. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हवालदार गवळी आप्पा यांच्या संपर्क व प्रयत्नातून चोरीस गेलेली मोटारसायकल शोधून काढण्यात आली. पोलिसांनी आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सदर मोटारसायकल आज मूळ मालकाकडे सुपूर्द केली.
पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरीस गेलेले वाहन पुन्हा मिळाल्याने वाहनमालकाने नरडाणा पोलिसांचे आभार मानले. या कारवाईबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
0 Comments