सामंजस्य करार स्वीकार करताना प्राचार्य डॉ. आशुतोष पाटील,ज्योती कपाले,संदीप तोरवणे,भूषण वानखेडे,डॉ.एस. व्ही .बोरसे,डॉ. व्हि.एस.पवार, डॉ. जितेंद्र पाटील,डॉ. सिद्धार्थ सावंत.
शिंदखेडा: येथील एस.एस. व्ही.पी. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा, आयक्यूएसी व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग आणि आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने 'रोजगाराच्या संधी' या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात आगाऊ खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये करिअर संधी, रोजगार क्षमता कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण, उद्योग केंद्रित प्रशिक्षण यांबद्दल जागृतता निर्माण करण्याच्या करून त्यांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महाविद्यालयातील टी. वाय. बी.ए., बी. कॉम., बी.एस्सी, एम.एस्सी वर्गातील, तसेच माजी विद्यार्थी असे एकूण ११० विद्यार्थी उपस्थित होते. आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रमाच्या प्रोग्राम स्पेशलिस्ट श्रीमती ज्योती कपाले यांनी नव्वद तासांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना नोकरी - व्यवसाय यासाठी कशाप्रकारे तयार केले जाणार आहे याबाबत प्रेझेंटेशनव्दारा माहिती दिली आणि प्रोग्रॅम इंटिग्रेटर श्री. संदीप तोरवणे यांनी संस्थेच्या अन्य सामाजिक उपक्रमांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना प्राचार्य डॉ आशुतोष पाटील यांनी रोजगार मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य कराराचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले. सध्या प्रवेशित असलेल्या आणि माजी विद्यार्थ्यांनी त्यासाठी दि. 07 ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करावी असे त्यांनी सांगितले.
वरील कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय बोरसे, उपप्राचार्य डॉ. विशाल पवार,
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सिद्धार्थ सावंत, एन.एस.एस. कार्यक्रम आधिकारी डॉ . सचिन जाधव, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील उपस्थित होते.
वरील कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ.आर.के. पवार, डॉ.आर. पी.चव्हाण, प्रा. के. एन. कोळी, डॉ. यू. पी.खैरनार, प्रा. आर. आर. पाटील, प्रा.शिरीष वारुडे, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पवार, पंकज साळुंखे, अजय पवार, सुनील देशमुख, सुरेश बच्छाव, विशाल पाटील व विजय पाटील यांनी सहकार्य केले.
वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील व आभार आयक्यूएसी समन्वयक डॉ. सिद्धार्थ सावंत यांनी केले.
0 Comments