शिंदखेडा : अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, उत्तम मार्गदर्शक आणि सर्वांचे सन्मित्र म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त प्राचार्य श्री. रवींद्र निंबा पाटील सर यांचा ५९वा वाढदिवस नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यानिमित्त बोरसे नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ‘अभिनव खान्देश’ व सूर्यवंशी परिवाराच्या वतीने शाल, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन पाटील सरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांना घडविण्यासोबतच सहकाऱ्यांमध्ये प्रेम, आपुलकी व मैत्रीचे नाते जपणारे पाटील सर आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्व मित्रपरिवारात ‘अजातशत्रू’ म्हणून परिचित आहेत.
यावेळी ‘संदेशनामा’ व ‘संकल्पनामा’चे संपादक ज्ञानेश्वर माळी आणि संपादिका सौ. जया माळी यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. उपस्थितांनी पाटील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत ‘शतायुषी व्हा!’ अशी सदिच्छा व्यक्त केली.
0 Comments