Header Ads Widget

*वादविवाद स्पर्धेत शिंदखेडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश*

शिंदखेडा: आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत), कौशल्य विकास केंद्र, पिंपळनेर आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन  पिंपळनेर येथे करण्यात आले होते. त्यात शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांनी 'कौशल्य विकास युवकांचे योगदान महत्वाची आहे का?' या  विषयावरील वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. आणि महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिमांगी पवार हीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सृजल मंगळे याने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक तर मधुश्री पवार व योगेश पवार यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. 
    सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे शिंदखेडा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल कुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक सुरेश देसले, प्राचार्य डॉ.आशुतोष पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस्. टी. राऊळ, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल समन्वयक प्रा.डॉ. जितेंद्र पाटील, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील, आगा खान ग्राम समर्थन संस्थेचे चिवीत जगदेव, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments