Header Ads Widget

३३ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर प्रकाश पंडित माळी यांचा सत्कार

शिंदखेडा प्रतिनिधी -:
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल ३३ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेले सैनिक प्रकाश पंडित माळी यांचा व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ, शिंदखेडा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.देशाच्या सुरक्षेसाठी ३३ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या प्रकाश पंडित माळी यांच्या योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला. देशसेवेनंतरही सामाजिक कार्यात सक्रिय राहून समाजासाठी योगदान देण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला असल्याचे उपस्थितांनी सांगितले.या वेळी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भूषण पवार, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, मार्गदर्शक प्रकाश चौधरी, सचिव मनोज गुरव, ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक चंद्रकांत डागा आणि महेंद्र गिरासे उपस्थित होते.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रकाश पंडित माळी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असून,अशा सत्कारातून त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा मिळतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.प्रसंगी प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.तालुकाध्यक्ष भूषण पवार यांनी त्यांच्या 33 वर्ष देशसेवा ही त्यागाचा, मेहनतीचा व समर्पनाचा प्रवास असल्याचे सांगितले. व्हॉइस मीडिया पत्रकार संघाच्या वतीने सत्कारमूर्ती प्रकाश माळी यांचा शॉल पुष्पगुच्छ व फुलहार देऊन सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments