Header Ads Widget

*टीईटी मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन*ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी टीईटी मार्गदर्शन वर्ग सुरू


बोराडी : किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ . बी. आर. आंबेडकर अध्यापक विद्यालय, बोराडी येथे टीईटी मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
शिक्षक होण्यासाठी टी .ई .टी . व सी .टी .ई .टी परीक्षा आवश्यक असते. त्या अनुषंगाने ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने डॉ . बी. आर. आंबेडकर अध्यापक विद्यालय, बोराडी येथे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आला आहे.
अध्यापक विद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉ . सुचित्रा वैद्य मॅडम यांच्या हस्ते या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, खेड्यातील तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची तीव्र इच्छा आहे; परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक विद्यार्थी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या मार्गदर्शन वर्गासाठी प्राचार्य डॉ .सुचित्रा वैद्य मॅडम, प्रा.उदय भलकार , प्रा. सविता  पाटील 
प्रा.जयसिंग पावरा  तसेच
 प्रा.अरविंद भामरे  विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील  शिक्षकेतर कर्मचारी गणेश भाऊसाहेब माधवराव  ठाकूर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments