नरडाणा प्रतिनिधी :
नरडाणा मंडळ कार्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
गांधी जयंतीचे औचित्य साधून कार्यालयात दप्तर व्यवस्था तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यालयातील कागदपत्रे व दप्तरांची व्यवस्थित मांडणी करण्यात आली तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता आणि शिस्तीचा संदेश देत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी मंडळ अधिकारी वाघ, तलाठी पाडेंल, मोरे, ठाकरे, पवार यांच्यासह मंडळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments