Header Ads Widget

३० वर्षांच्या प्रामाणिक पोलीस सेवेला पदोन्नतीचे फलित!एएसआयपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल भावसिंग गिरासे यांचा व्हाईस ऑफ मीडियातर्फे सत्कार


शिंदखेडा प्रतिनिधी :
आलाने गावचे सुपुत्र तथा गुजरात राज्याच्या पोलीस दलात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणारे भावसिंग नारायणसिंग गिरासे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघ, तालुका शिंदखेडा यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिंदखेडा येथील विश्रामगृहात आयोजित या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील होते.
भावसिंग गिरासे यांनी गेल्या तीन दशकांपासून गुजरात राज्याच्या पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळत प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली आहे. त्यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेला आणि सेवा ज्येष्ठतेला मिळालेले फलित म्हणून त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर पदोन्नती झाली आहे. सध्या ते बिलिमोरा रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.
या पदोन्नतीबद्दल व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भावसिंग गिरासे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या. भावसिंग गिरासे हे व्हाईस ऑफ मीडियाचे सक्रिय सदस्य महेंद्रसिंग गिरासे यांचे मामा आहेत.
कार्यक्रमात मार्गदर्शक प्रकाश चौधरी आणि ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत डागा यांनी मनोगत व्यक्त करत भावसिंग गिरासे यांच्या तीन दशकांच्या पोलीस सेवेचा, प्रामाणिकपणाचा आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरव केला.
यावेळी तालुका अध्यक्ष भूषण पवार, कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, मार्गदर्शक प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष मुरलीधर महाजन, सचिव मनोज गुरव, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत डागा, संजयकुमार महाजन, महेंद्रसिंग गिरासे, जितेंद्र सूर्यवंशी, महेंद्र मराठे तसेच महिला शहराध्यक्ष शोभाताई पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मनोज गुरव यांनी केले, तर आभार संजयकुमार महाजन यांनी मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
भावसिंग गिरासे यांच्या पदोन्नतीमुळे आलाने गावासह शिंदखेडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments