आर सी पटेल माध्यमिक विद्यालय सावळदे येथे दिनांक 03/10/2026 रोजी विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीविषयी व्यवस्थापन माहिती, स्वच्छतेच्या सवयी आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने "मासिक पाळी स्वच्छता व व्यवस्थापन" या विषयावर मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कार्यक्रमच्या *मार्गदर्शन श्रीमती व्ही एस माळी, श्रीमती ए जी पाटील श्रीमती एम डी पाकळे यांनी मुलींना मार्गदर्शन केले . विद्यार्थिनींना मासिक पाळी ही शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत संकोच न बाळगता योग्य माहिती व स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले.
मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटरी पॅडचा योग्य वापर, वेळोवेळी पॅड बदलणे, वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट लावणे, हातांची स्वच्छता तसेच संतुलित आहार व पुरेसे पाणी पिण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
तसेच मासिक पाळीशी संबंधित गैरसमज दूर करून विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि कोणतीही आरोग्यविषयक अडचण जाणवल्यास पालक किंवा शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमास शाळेतील मुख्याध्यापक श्री डी के चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पी आर मोरे, श्रीमती एस बी चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कार्यकमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम व्ही चव्हाण यांनी केले.
विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीविषयी सकारात्मक दृष्टिकोन, स्वच्छतेच्या योग्य सवयी आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
0 Comments