धुळे-नगाव एज्युकेशन सोसायटी संचलित गंगामाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा मनोज लांडगे-न्याहळदे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात बी.एड्.च्या परीक्षेत 92.25% गुण मिळवून महाविद्यालयात सर्वप्रथम आणि क. ब. चौ. उ.म.विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
हर्षदा लांडगे-न्याहळदे ही ताडेपुरा अमळनेर येथील आदर्श शिक्षक दांपत्य स्व. अण्णा गोधा लांडगे गुरुजी व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती भिकुबाई अण्णा लांडगे (मोराणीज), धुळे जिपचे माजी लेखाधिकारी अशोक गणपतराव चव्हाण यांची नात व आदिवासी विभाग नाशिकचे सहाय्यक आयुक्त अविनाश अशोक चव्हाण यांची भाची आहे. नगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक मनोजअण्णा लांडगे व शिरपूर बीआरसीच्या माजी रिसोर्स पर्सन सौ. माधुरी मनोज लांडगे यांची कन्या व शिरपूर येथील हरिष आधार न्याहळदे यांची पत्नी आहे.
हर्षदाने घर परिवार, सासर-माहेर व दोन वर्षाचा मुलगा शिवांश या सर्वांना सांभाळून व वडीलांच्या एमव्हीआर (ओपन हार्ट मेंट्रल व्हॉल रिप्लेसमेंट) ऑपरेशनच्या वेळी सन 2017 मध्ये एन.एच.एम. विभागात कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय शिंदखेडा येथील नोकरी वडीलांची देखभाल करण्यासाठी सोडली. तरीही तिने शिक्षणाचा ध्यास सुरुच ठेवला. सतत प्रथम वर्ग, प्रथम क्रमांक मिळविला. एस.एन.डी.टी. कॉलेजमध्ये एफ.वाय., एस.वाय., टी.वाय.बी.ए. ला प्रथम आली आणि घर, परिवार, कॉलेज, नोकरी स्वत:च्या जबाबदारीने सांभाळणार्यांना एस.एन.डी.टी. मार्फत दिला जाणारा स्वयंसिद्धा पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 18 जानेवारी रोजी हर्षदाचा मुंबईत सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले होते. तिने महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्येही पारितोषिके पटकावली आहेत. हर्षदाच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
*******

0 Comments