Header Ads Widget

*शिंदखेडा विकास संघर्ष समिती, शिंदखेडा यांच्या वतीने शिंदखेडा येथे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी मागील 2 वर्षांपासून शर्तीने पाठपुरावा सुरूच*



शिंदखेडा येथील काही प्रमुख समस्या आहेत ज्या सोडविण्यासाठी सर्व्यांनी एकत्र येणे गरजेचे होते याचे भान ठेवून शहर व परिसरातील काही तरुण एकत्र येऊन शिंदखेडा विकास संघर्ष समिती उभी केली. शिंदखेडा येथे ग्रामीण रुग्णालयात समस्याच समस्या आहेत आणि यात सुविधा मिळाव्यात म्हणून खूप पूर्वी पासून यासाठी अनेक सामजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी प्रयत्न केलेत. पण  ग्रामीण रुग्णालयालयाचा स्तर असल्यामुळे काही सुविधा मिळणे शक्य झाल्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन समितीने या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे ठरविलं आणि येथील समस्या या शिंदखेडा येथील ग्रामिण रुग्णालयाचे सर्व सोयींयुक्त उपजिल्हा रुग्णालय झाल्यावरच सुटतील असे निर्धार करून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे सर्वसोयींनी युक्त उपजिल्हा रुग्णालय झाले पाहिजे असे  सर्वप्रथम शिंदखेडा विकास संघर्ष समिती ने दि.15/09/2019 रोजी वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 सो,शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय यांना निवेदन देऊन विषय मांडला. तसेच शासन दरबारी पाठपुरावा करण्यास विंनती केली.

Post a Comment

0 Comments