*जनमत-*
*दोंडाईचा-* येथे नुकतेच राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार दोंडाईचा वरवाडे सार्वत्रिक नगरपालीका निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धीबाबत व विक्रीसाठी मा.मुख्याधिकारी व तत्सम जिल्हा, तालुका कार्यालयावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या कोणास एखाद्या मतदाराचे नाव,पत्ता,वार्ड,प्रभाग यावर सुचना हरकती,बदल घडवून आणायचा असल्यास त्यांनी २७ जुनपर्यंत आपल्या सुचना हरकती मा. मुख्याधिकारी, मा.अप्पर तहसिलदार, मा.तहसिलदार, मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत पोहचवाव्या,असे आदेशीत करण्यात आल्याने, जो-तो गटनेता,इच्छुक-भावी.उमेदवार- नगरसेवक हे ज्या मतदारांवर आपले भविष्य-निवड अवलंबून आहे, त्या मतदाराचे थोडक्यात सोयीच्या-हक्काच्या मतदाराचे नाव,पत्ता,वार्ड,प्रभाग छाननी-चिरफाड करून हवा त्या ठिकाणी वार्डात-प्रभागात फेरबदल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना दिसत असल्याचे चित्र सध्यातरी निवडणुक पाश्वभुमीवर गटनेता व इच्छुक भावी नगरसेवक यांच्या घरांपुढे-कार्यालयापुढे दिसत आहे.
दोंडाईचा वरवाडे नगरपालीकेच्या हद्दीत ह्या वर्षी गावाबाहेर बांधलेल्या वेगवेगळ्या घरकुलात रहिवासी विभागले गेल्याने तसेच मतदानात अंशतः झालेली वाढ लक्षात घेता.मागील पंचवार्षिक निवडणुकीत चोवीस नगरसेवक उमेदवार होते.तर ह्यावर्षी सव्वीस नगरसेवक तेरा प्रभाग मधून आपले नशीब आजमवणार आहेत.म्हणून मागील पंचवार्षिकला जी मतदार यादी होती. ती प्रत्येकाला सोयीची होती. प्रत्येक नगरपालीका निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीला कोणता मतदार कुठे राहतो,त्याच्या घरात मतदाराची संख्या किती,तो कोणत्या व्यक्तीचा-पक्षाचा विचारांचा बांधलेला आहे किंवा स्वतंत्र विचारसरणीचा आहे.तसेच त्याचे घरात अडचणी-प्रश्न-समस्या कोणत्या आहेत. याची बारीकसारीक माहिती, एखाद्या तज्ञ डॉक्टर सारखी त्यांची प्रँक्टीस वार्ड-प्रभागात झालेली होती. म्हणून आपला विजय की पराजय होईल ते सहज सांगू शकत होते व अचूक अंदाजही बांधू शकत होते. मात्र राज्य निवडणुक आयोगाने मागे जसे सँटेलाईट-गुगल ट्रँकने मतदारांचा सर्वे करून नवीन मतदार यादी विधानसभेच्या वेळेस आमलात आणली. तीच मतदार यादी ह्या नगरपालीका निवडणुकीत जैसे-थै ठेवत, निवडणुका घ्यायचे निश्चित केले आहे. त्यामुळे सँटेलाईट-गुगलट्रँकमुळे अनेक मतदार यावेळी इकडचे-तिकडे आणि तिकडचे-इकडे झाले आहेत. त्यात अनेक प्रभागात-वार्डात नदीकडील इकडचे मतदार नदीकडील तिकडच्या म्हणजे ज्या वार्डातील-प्रभागातील व्यक्तीशी यापुर्वी कधी मतदानासाठी संबध आला नाही. यावेळेस मात्र नवीन सँटेलाईट-गुगलट्रँक मतदार यादी दुसऱ्या प्रभागात-वार्डात जोडली गेल्यामुळे मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे ह्या सर्व मतदार उथलफुथल कारभारामुळे गटनेत्यांसह सर्व भावी-इच्छुक उमेदवार अडचणीत आले असुन, जशी प्रारूप यादी डिक्लेर झाली. तशी त्यांनी नगरपालीकेत यादी घेण्यासाठी व त्यावर छाननी-चिरफाड करत,सोयीचा-हक्काचा मतदार कसा आपल्या वार्डात-प्रभागात सुरक्षित ठेवता येईल. यासाठी २७ जुनच्या आत सुचना-हरकती मा.मुख्याधिकारी, मा.अप्पर तहसीलदार, मा.जिल्हाधिकारी यांच्या दालनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाची लगभग सुरू आहे. त्यामुळे येणारा मतदारच ठरवेल की,कोणता नगरसेवक -गट निवडून येईल व कोणता नगरसेवक-गट पडेल, हे पाहणे जनतेला उत्सुकतेचे झाले आहे.
0 Comments