Header Ads Widget

धुळे महापालिकेत अजब-गजब कारभाराचे नमुने , महापालिकेच्या दवाखान्यातील एका डॉक्टरने हजेरी रजिष्टरमध्ये ॲडव्हान्स स्वाक्षरी केल्या



धुळे : धुळे महापालिकेत अजब-गजब कारभाराचे काय नमुने समोर येतील हे कुणी सांगू शकत नाही. प्रशासनाच्या पातळीवर तर 'एकसे बढकर एक' नमुने पाहायला मिळतात. असा एक नमुना समोर आाला आहे.

 महापालिकेच्या दवाखान्यातील एका डॉक्टरने हजेरी रजिष्टरमध्ये ॲडव्हान्स स्वाक्षरी केल्या आहेत. अर्थात ज्या तारखा अजून यायच्या आहेत, त्या दिवशीही त्यांनी हजेरी भरली आहे. त्यामुळे महापालिकेचा एकूणच प्रशासकीय कारभार किती आंधळेपणाने सुरू आहे हेच यातून दिसते. महापालिकेत अधून-मधून एक ना अनेक किस्से समोर येतात. यात प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर बिनधास्तपणा पाहायला मिळतो. अनेक अधिकारी-कर्मचारी कोणताही शासकीय नियम न पाळता आपल्या मर्जीप्रमाणे महापालिकेत वावरतात. अनेकजण तर आओ-जाओ घर तुम्हारा अशा पद्धतीने वागतात. हजेरीबाबतही असाच बिनधास्तपणा पाहायला मिळतो. मागच्या काळात काही आयुक्तांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र तसा दरारा पाहायला मिळत नाही. हा दरारा नसल्यानेच कदाचित चक्क विभागप्रमुखच ॲडव्हान्स हजेरी लावण्याचे धाडस करतात असे म्हटले तर वावगे ठरू नये.

२७ जूनपर्यंत सह्या

महापालिकेच्या दवाखान्यातील एका डॉक्टरने त्यांच्या कार्यालयातील हजेरी रजिस्टरमध्ये चक्क २७ जून २०२२ पर्यंत सह्या ठोकल्या आहेत. या विभागप्रमुख डॉक्टरांच्या नावाखालीच काही कर्मचाऱ्यांची नावे आहेत, या कर्मचाऱ्यांपैकी एकाने रजेचा उल्लेख केल्याचे दिसते तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने बुधवार (ता.२२) अर्थात आजअखेर हजेरी लावल्याचे दिसते. विभाग प्रमुखालाच ॲडव्हान्स सह्या करण्याची का गरज भासली असेल असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो.

Post a Comment

0 Comments