दिनांक - २२/१०/२०२२ शनिवार
शिंदखेडा तालुक्यातील म्हळसर येथील काका- पुतण्यांची मुक्याप्राण्यांविषयी आत्मभाव सेवा!
सविस्तर वृत्त असे की,म्हळसर येथील श्री.शांताराम भिला कोळी व त्यांचा पुतण्या सचिन चतुर कोळी या दोघे काका - पुतण्यांनी दिनांक२१/१०/२०२२ शुक्रवार रोजी "वसुबारस"या दिवशी यांनी म्हळसर - मुडावद रस्ता लगत ग्रामपंचायत अंतर्गत गावात पशूप्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी बांधलेला हौद(हाय).या हौदात चक्क गाळयुक्त गढूळ पाणी असल्याने ते पशुप्राण्यांना पिण्याअयोग्य असे दिसल्याने श्री.शांताराम कोळी व त्यांचा पुतण्या सचिन चतुर कोळी या दोघे काका - पुतण्यांनी हौद संपूर्ण स्वच्छ करून पशुप्राण्यांना शुध्दयुक्त पाणी मिळेल व लम्पीसारख्या व इतर रोग गुरेढोरांना होणार नाही,या आत्मभावनेने दोघे काका - पुतण्यांनी श्रमदानातून श्रमप्रतिष्ठा काय असते ते या वरील क्षणचित्रातून व संत गाडगे बाबा स्वच्छतेविषयीचे विचार निश्चित प्रतिबिंबित आजच्या तरूण पिढीवर सुसंस्कार,दूरदृष्टी, चातुर्यपणा,प्रामाणिकपणा प्रेमळपणा,संवेदनशीलता विवेकनिष्ठ,आत्मविश्वास,उत्साह इ.बाबी मनात रोवतील.व आजकाल अनेक विनाकामाच्या चर्चा चर्चेअंती होतात.परंतु त्यातून "मणभर चर्चेपेक्षा क्षण कृती श्रेष्ठ ". हे या बाप- लेकांचा श्रमसेवेतून मुक्याप्राण्यांची सेवा ही एक ईश्वरी सेवाच होय. या दोघेही काका- पुतण्यांचे म्हळसर व पंचक्रोशीतील मित्र मंडळीकडून कौतुकास्पद व शाब्बासकीची थाप!, गोपाळा-गोपाळा देवकी नंद गोपाळा!
0 Comments