Header Ads Widget

*शिंदखेडा रस्त्यावर येणार काटेरी झाडे-झुडपे काढायला झाली सुरुवात..भायुमोचे सुरज देसले चा सातत्याने प्रशासना कडे पाठपुरावा.*




   शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी---               शिंदखेड्यातील काही रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहनांची ,  विद्यार्थ्यांची व पायी जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. रस्त्यालगत काटेरी झाडे झुडपे मोठया प्रमाणावर वाढलेले असल्याने झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने समोर येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात देखिल होत होते , म्हणूनच प्रशासनाकडे भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष तथा मा.नगरसेवक सुरज देसले यांनी रस्त्यावर येणारे काटेरी झाडे झुडपे काढावे अशी मागणी केली होती. तसे निवेदन देण्यात आले होते. तात्काळ प्रशासनाने दखल घेत आजपासून  जे.सी.बी च्या सहाय्याने काटेरी झाडे झुडपे काढायला सुरुवात झाली. ह्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले म्हणून शहरातुन,खास करून विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments