शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकतेच वेतनेत्तर अनुदानातून शाळेत सी.सी.व्ही कॅमेरे बसविण्यात आलेत.
सविस्तर वृत्त असे की,माता तुळजा भवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित,अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी,ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयास मा.म.शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.धुळे आदरणीय श्री.नानासाहेब एम.एस.देसले साहेब यांनी दिनांक-१५/६/२०२२रोजी भेट दिली असता त्यांनी विद्यालयात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवा अशा सूचना केल्या त्यावेळेस विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम म्हणाले की,साहेब वेतनेत्तर अनुदान प्राप्त झाल्यावर लगेचच बसवतो.या मुख्याध्यापकांच्या मनोभावनेची दखल घेऊन आदरणीय, शिक्षणाधिकारी श्री.नानासाहेब यांनी वेतनेत्तर अनुदान प्राप्त करून दिल्याने लगेचच विद्यालयात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आलेत, असे चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी लाभल्याने ,भेटल्याने एक निकष पूर्ण करू शकलो,असे विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी मत मांडले.या कार्यकुशलता भावनेने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.आबासो.जे.बी.पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांनी मा.म.शिक्षणाधिकारी नानासाहेब श्री.एम.एस.देसले साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त केलेत.
0 Comments