Header Ads Widget

*शिंदखेडा येथील आदिवासी समाजाला भुमी अभिलेख विभागाला मोजणी जमा भरण्यासाठी नगरपंचायत ला निवेदन*



 शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी--.                  येथील गेल्या दोन वर्षांपासून भिल समाज विकास मंचच्या माध्यमातून 12,15 गावठाण बंगला भिलाटी, नदीपार भिलाटी, रज्जाक नगर, साबरहह्टी रहिवासी आदिवासी समाजाला पंतप्रधान आवास योजना घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी आदिवासी विकास मंत्री मा. विजयकुमार गावित यांच्याकडे ह्या विषयावर निवेदन व चर्चा केली आहे तसेच भुमि अभीलेख कार्यालय व नगरपंचायत कडे मागणी केली असता पाठपुराव्याला यश आले असले तरी नगरपंचायत ने संबंधित भुमि अभीलेख कार्यालयात जमा भरुन मोजणी करून मिळावी यासाठी आज भिल समाज विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत येथे इशारा मोर्चा वजा निवेदन मुख्याधिकारी ह्यांचे प्रतिनिधी वामन अहिरे यांना देण्यात आले. त्यातून आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा त्यांचें मुलभूत हक्क हिरावून घेऊ नये.नगरपंचायत हद्दीतील पंतप्रधान आवास योजना घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रतिक्षेत असलेल्या संबंधित आदिवासी समाजाला भुमी अभिलेख विभागाला साठी जमा भरुन मोजणी करून मिळावी यासाठी मागणी आज निवेदनाद्वारे करीत आहेत. तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. तसं न झाल्यास दिवाळी नंतर नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात तीव्र आमरण धरणे आंदोलनाचा इशारा यानिमित्ताने देण्यात आला यास सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासन आणि शासनाची राहील असे नमूद केले आहे ह्यावेळी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, बापुजी फुले, सुनील सोनवणे, राजेश मालचे, संजय मोरे, कालु मोरे, नाना पोपट चौधरी, नंदकिशोर पाटील,सुक्राम सोनवणे, राहुल भिल, गोपाल भिल, किरण चित्ते यांच्या सह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments