*ह्यावर्षी अंध बांधवांची दिवाळी गोड करण्याचे,दोंडाईचा शहरातील दानशुर व्यक्तींना जनमतचे आवाहन...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* भारतात दिपावली हा एक लोकप्रिय सण आहे. तसेच दिपावली दिव्यांच्या व प्रकाशाचा सण आहे. ह्या सणामुळे समाजात एकीची भावना वाढते. दिवाळीला प्रभु श्री रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत परतले होते. त्यामुळे दिवाळीत सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीला सर्वजण भल्या पहाटे उठून, उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. घरोघरी लाडू-चकल्या-शंकरपाळे-कंरज्या-सांजऱ्या-गोड मिठाई इत्यादी फराळ बनवितात. दिवाळीला प्रत्येक घरी रांगोळी-दिवे आकर्षक पणत्या, आकाशकंदीलने सजवले जातात.
मात्र जसजसे जग पुढे सरकत जात आहे म्हणजे आधुनिकीकरण-विकसनशीलतेकडे पाऊल टाकत आहे. तसतसे करूणा-दयाभाव- माणुसकी-एकीची भावना लुप्त होत चालल्याचे दिसत आहे.आज दिवाळीत प्रत्येकजण आपल्या उराशी काही नवीन ध्येय-खरेदी करायचे एक कोणते ना कोणते स्वप्न बाळगुन राहतो व तो पुर्णही करतो.मात्र ज्यांच्या नशिबी जन्मतःच अंधार आला आहे किंवा देव-निसर्ग क्रुपेने दुर्ष्ट्रीहीन जीवन नशीबी आले आहे, अशांना आपल्या जीवनात कुठेही दुरदुरपर्यंत उजेड-प्रकाशाचे स्रोत दिसत नसेल,तर अशा लोकांचा साधा विचार जरी मनात आला तरी त्यांचे जीवन जगणे किती कठीण असून अंगाला शहारे आणणारे आहे. हे सर्व सांगायचा एकच मर्म-उद्देश आहे की, दिवाळी हा सण तोंडावर आला आहे. प्रत्येकजण आपली दिवाळी कशी चांगली जाईल ह्या तर्क वितर्क भावनेतुन साजरी करण्यात गुंग आहे. मात्र दोंडाईचा शहर व परिसरात जे वीस -बावीस दुर्ष्ट्रीहीन-अंध बांधव आहेत. त्यांचा विसर मात्र समाजाला-स्वतःला समाजसेवक-लोकप्रतिनिधी- पुढारी- दानशुर समजणाऱ्या व्यक्तींना पडत चालला आहे. म्हणून जनमतने व राष्ट्रीय दुर्ष्ट्रीहीन संघ नासिकचे सचिव आदींनी मिळून दोंडाईचा शहरातील काही मोठी हस्ती- पुढारी लोकप्रतिनिधी-व्यापारी- समाजसेवक-दानशुर व्यक्ती संस्था यांच्याशी संपर्क साधत, ह्यावर्षी गावातील ह्या अंध-दुर्ष्ट्रीहीन बांधवांची दिवाळी फराळ-किराणा किट वाटप करून कशी गोड करता येईल, याबाबत चर्चा केली. मात्र अनेकांनी वेगवेगळी कारणे देत,ऐवढा खर्च आमच्याने शक्य नाही. लागल्यास तीन-चार अंध बांधवांना मदत करू शकतो,अशी कारणे दिली. आम्हाला येथे कोणावर ताशेरे ओढायचे नाही आहे. खंत फक्त ऐवढी आहे की,
आज ह्या आपल्या दोंडाईचा गाव-शहर परिसरातील सर्व दुर्ष्ट्रीहीन-अंध बांधवांना सरकार-शासनकडून वर्षाकाठी कोणतेही मोठे पँकेज,उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार-गाळे उपलब्ध होत नाही. उलट ह्या अंध बांधव आहे त्या तुटपुंज्या परिस्थितीत जीवन व्यतीत करीत असतात. काहींना कुटूंब शेवटपर्यंत साथ देते तर काहींना कुटूंब-परिवारातील लोक अर्ध्यातच वेगळे- स्वतंत्र वाटेवर जगण्यास सोडून देतात. म्हणून अशांनाही जीवन जगण्याचा-आनंदाचे क्षण उपभोगण्याचा व दिवाळीचा सण साजरी करण्याचा अधिकार आहे. म्हणून जनमत पुन्हा ह्या सोशल-मिडीया प्लँटफार्म मार्फत दोंडाईचा शहरातील दानशुर-समाजसेवक-पुढारी- लोकप्रतिनिधी-सोशल क्लब यांना सार्वजनिक आवाहन करते की, ह्या अंध-दुर्ष्ट्रीहीन बांधवांच्या मदतीसाठी एक-एक, दोन-दोनच्या संख्येने का गोळा होत नाही. पण एकत्र येत,एकजुटता दाखवत ह्या अंध-दुर्ष्ट्रीहीन बांधवांची ह्यावर्षीची दिवाळी गोड करा,शेवटी ऐवढीच माफक अपेक्षा.
0 Comments