शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी--- शिंदखेडा येथील भोईराज पतसंस्थेमध्ये दोन वर्षापूर्वी जवळपास एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला उघडकीस आलेला आहे. भोईराज पतसंस्थेचे मॅनेजर यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक ही झाली परंतु भोईराज पतसंस्थेमध्ये मध्ये अनेक हातमजूर, गोरगरीब लोकांचे पैसे व ठेवी दोन वर्षापासून अटकलेले आहेत, गोरगरीब लोकांचे मेहनतीचे पैसे दोन वर्षापासून प्रशासक बसून सुद्धा एक रुपयाची वसुली केलेली नाही आणि गोरगरीब लोकांना पैसे परत केलेले नाही म्हणून आज आम्ही सर्वजण ठेवीदार भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसीलदार निशा नाईक यांनी स्विकारले. निवेदन द्वारा म्हटले आहे की, ठेवीदारांचे गोरगरीब लोकांची पैसे तात्काळ मिळावेत. देत आहोत, आम्हाला आमचें पैसे 10 दिवसांच्या आंत पैसे मिळाले नाही तर तहसिलदार कार्यालय शिंदखेडा समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल हि नम्र विनंती.आंदोलन वेळीस अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील याची गंभीर दखल घ्यावी.हयाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, चंद्रकांत सोनवणे, सुनील सोनवणे, हिराबाई परदेशी, अविनाश पाटोळे,बानुबाई भिल, अनिल कापुरे , मायाबाई भोई , नाना भोई, परसुराम भोई , श्रावण मराठे, गोकुळ भोई, काशीनाथ भोई, वामन भोई, किशोर चौधरी, गोफी शिंपी, पानाबाई भिल, सुरेखाबाई भिल, कृष्णा भोई आदी ठेविदार व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments