Header Ads Widget

*खलाणे जि प.शाळेचे आदर्श शिक्षक कैलास वाघ यांची आकाशवाणी वर मुलाखत सादर होणार*




 शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- तालुक्यातील 
  जिल्हा परिषद शाळा खलाणे शाळेचे उपक्रमशील व आदर्श शिक्षक कैलास वाघ यांची धुळे आकाशवाणीवर प्रसारण झालेली मुलाखत २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षण परिषद मध्ये पुनः प्रसारण होणार आहे. 
             खलाणे येथील जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक कैलास वाघ यांची धुळे आकाशवाणी केंद्रावरील प्रेरणादायी मुलाखत राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ : ४० वाजता प्रसारीत करण्यात आली.
                जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळे यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक महिन्यात शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी शिक्षण परिषद आयोजन करण्याविषयी उद्देश स्पष्ट आहेत. शिक्षण परिषद मध्ये वेळा प्रत्रकानुसार शिक्षकांसाठी विषयाचे नियोजन केले आहे..या नियोजनात दुपारच्या सत्रात वेळ  २ : ३० वाजता कैलास वाघ यांची चानी जैन यांनी घेतलेली मुलाखत you tube लिंक च्या माध्यमातून पुनः प्रसारित होणार आहे. हि मुलाखत रोशन जाधव यांनी सादर केली होती. या प्रेरणादायी मुलाखतीवर चर्चा ही होणार आहे.
       जिल्हा शिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिक्षण परिषद विभाग प्रमुख डॉ. अधिव्याख्याता शिवाजी ठाकूर यांनी शिक्षण परिषदेचे नियोजन केले आहे.
              गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के पाटील,चिरणे बीट विस्तार अधिकारी श्रीमती शैलजा शिंदे, केंद्रप्रमुख आर.जी. राजपूत शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत डिगराळे,अतुल खोडके,राजेंद्र पाटील,राकेश पाटील,ज्ञानेश्वर तवर विद्या जाधव, जयश्री गीते,शितल चव्हाण यांनी श्री.वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments