साक्री - येथील श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मेडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना दर वर्षाप्रमाणे गेल्या दिपावळी सुटीतही मातीचे किल्ले बनविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून इ.पहिली ते चौथीच्या वर्गातील 22 विद्यार्थ्यांनी दिपावलीच्या सुटीत मातीचे किल्ले बनविले होते, त्यांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले होते.या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या बाल वयातच मातीचे किल्ले बनवितांना आपल्या शिल्पकलेला वाव देण्याचा केलेला प्रयत्न अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला.या उपक्रमाबद्दल सदाचार ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे चेअरमन प्रभाकरदादा चौधरी, सचिव प्राचार्य एस्. एन्. खैरनार प्राचार्य बी. एम. भामरे, सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

0 Comments