महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विमा कंपन्यांकडून होत असलेले शेतकऱ्यांची लूट, शेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किंमत, काँग्रेस सरकारने दिलेले वनपट्टे व वनपट्टेधारकांना न मिळालेले सातबारा, धान खरेदीत होणारा भ्रष्टाचार तसेच न मिळालेला बोनस अशा अनेक प्रश्नावर भारत जोडो अभियानात किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्याबरोबर चर्चा केली
या प्रश्नाचा ओहापोह राहुलजींनी आपल्या शेगाव येथील प्रचंड विराट सभेत करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या बाबत सरकारला धारेवर धरले. राहुल जीनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिलेल्या दिशा निर्देशानुसार महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पाटोळे व किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खैराजी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारण्याचा संकल्प केला असल्याचे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी पत्रकारां सोबत बोलताना सांगितले.
बुलढाणा व अकोला जिल्ह्यात झालेल्या या भारत जोडो अभियानात किसान काँग्रेसचे बाराशे कार्यकर्ते सहभागी झाले होते तर पालघर जिल्ह्यातून किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे व पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली 256 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातील फॉरेस्ट धारकांचे प्रतिनिधी शेतकरी प्रतिनिधी जळगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला, शेतमजूर प्रतिनिधी, बँक संचालक व सेवा सोसायटी चेअरमन व संचालक पप्रतिनिधी आदिवासी समाजातील शेतकरी व शेतमजूर प्रतिनिधी आधी किसान काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments