Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील रुदाणे परिसर वस्तीतील विविध समस्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन - आश्वासनानंतर आंदोलन मागे*




                 शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी -- तालुक्यातील शेवाडे ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत रुदाणे पैकी नवापाडा,चौकी दोन्ही पाडयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आदिवासी 


समाजाच्या वतीने कुटुंबासह बेमुदत बिडार ठिय्या आंदोलन पंचायत समिती कार्यालय समोर करण्यात आले होते. विविध समस्या एक महिन्याच्या आत सोडवुन संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी या अटीवर आंदोलन मागे घेण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत रुदाणे पैकी नवापाडा चौकी दोन्ही पाडयांच्या विविध समस्या पैकी पाणीपुरवठा व विहीर मंजूर करून नळ कनेक्शन पुरविणे ही प्रमुख मागणी वर प्राधान्याने लक्ष देऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विस्तार अधिकारी सावकारे यांनी आंदोलन कर्तेना सांगितले यासह चौकीपाडा ते नवापाडा रुदाणे गावांपर्यंत रस्त्यांचे मुरुम,माती भरण रस्ता सपाटी करणे, अर्जुन वीर बाबा व भवानी मातेचे मंदिर चौकीपाडा येथे बांधणे, दोन्ही वस्तीवर पाचशे लिटर पाण्याची टाकी व हौद बनविणे, शौचालय व मुतारी बांधणे, क्राक्रिटीकरण,हायमास्ट लॅम्प बसविणे, एक शासकीय कामासाठी कमेटी नेमणूक करणे,समाजगृह व समाज ओटा बांधणे, ग्रामपंचायत चे उपकार्यालय बांधणे, आठवड्यातुन ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी एक दिवस भेटीसाठी द्यावे.अंगणवाडी व जि.प.शाळा बांधणे गेल्या कित्येक वर्षांपासून कोणत्याही प्रकारची सुविधा नसलेल्या पाड्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ग्रामपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सचिन शानाभाऊ पवार हे कर्मचारी असून शासनाची दिशाभूल करत ग्रामपंचायत सदस्य देखील झाले आहेत तरी त्यांची देखील चौकशी केली जावी तसेच पोलिस पाटील कविता सचिन पवार यादेखील कामांना अडथळे आणुन विकास कामे होऊ देत नाहीत म्हणून संबंधित पदाधिकारी ची देखील चौकशी केली जावी यासाठी सत्तप्त  आदिवासी समाजातील बांधवांनी बेमुदत बिडार ठिय्या आंदोलन पंचायत समितीच्या आवारात सुरू केले होते उशीरापर्यंत सदरील आंदोलन गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून विस्तार अधिकारी सावकारे यांनी एक महिन्याच्या आत सदरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन कर्तेनी आंदोलन मागे घेतले.यावेळी विठ्ठल नानाभाऊ महाले, विठ्ठल सखाराम बागुल, ज्ञानेश्वर पावबा महाले, बापू काशिराम पवार,नरेश रावबा महाले, विष्णू बालु महाले,रत्ना सुरेश महाले,नंदा बापू पवार, सारिका नरेश महाले, ज्योतीबाई भगवान महाले, विमलताई पावबा भिल आदिंसह आदिवासी समाज कुटुंबासह उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments