शिंदखेडा - शिंदखेडा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा यांचा संयुक्तिक 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. एस.सी देसले हे होते.अध्यक्षांच्या हस्ते मेजर ध्यानचंद
यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डॉ. आर.आर.पाटील व संस्थेचे सचिव दादासाहेब इंजि.उज्वल आर.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आलेत.
कार्यक्रमासाठी उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिरच्या प्र.मुख्याध्यापिका ए.के.माळी, शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments