नरडाणा -- म. दि. सिसोदे कला, वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या आदेशानुसार 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य डॉ. यू. जी. पाटील यांनी भूषवले. प्रमुख अतिथी माजी प्राचार्य डॉ समाधान पाटील हे होते. क्रीडा संचालक प्रा. महेंद्र नगराळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या विषयी माहिती दिली. प्राचार्य साहेब यांनी प्रतिमा पूजन करून क्रिडांगण पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे वरिष्ट प्राध्यापक वृंद प्रा. नाना पाटील प्रा. ए. आर वसावे, प्रा. दत्तात्रय धिवरे, प्रा. डॉ. पी. जी. सोनवणे, प्रा. डॉ बी. एम पाटील, प्रा एन. वाय खैरनार, प्रा राहुल जाधव, प्रा. गिरीश पवार, प्रा. परमार, प्रा. ए. पी, निकम यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला.
0 Comments