Header Ads Widget

*धुळे तालुक्यातील भाजपाचे पुर्व व पश्चिम मंडळ तालुकाध्यक्षांच्या निवड बैठकीत जिल्हा प्रभारी, माजी. आ. स्मिताताई वाघ, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले मार्गदर्शन*





 धुळे : भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष निवडीसाठी प्रदेश उपाध्यक्षा, जिल्हा प्रभारी माजी आ. स्मिताताई वाघ, धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी धुळे तालुक्यातील पुर्व व पश्चिम भाजपा मंडळ तालुकाध्यक्ष निवडसाठी दि. २८ आॅगस्ट रोजी राम पॅलेस धुळे येथे बैठक घेतली. अध्यक्ष निवडसाठी अनेकांनी मुलाखाती दिल्यात. जिल्हा प्रभारी माजी आ. स्मिताताई वाघ, धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच मंडळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया समजावून सांगितली. मंडळ अध्यक्षपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची प्रत्यक्षात भेटीही घेतल्यात. यावेळी बुथ बळटीकरण, मतदार शसक्तीकरण, सरल ॲप तसेच पुढील वाटचाल व आव्हानांबाबत मार्गदर्शनही केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिप सदस्य राम भदाणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भैय्या पाटील आदींसह भाजपाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थाचे संचालक, सरपंच, सदस्य व सक्रीय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments