साक्री : भारतीय जनता पार्टी साक्री तालुकाध्यक्ष निवडसाठी प्रदेश उपाध्यक्षा, जिल्हा प्रभारी माजी आ. स्मिताताई वाघ, धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थित दि. २८ आॅगस्ट रोजी साक्री येथे बैठक झाली. तालुकाध्यक्षसाठी अनेकांनी मुलाखाती दिल्यात. जिल्हा प्रभारी माजी आ. स्मिताताई वाघ, धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश सदस्य सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील, जिल्हा परिषद कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, तालुकाध्यक्ष वेडु सोनवणे, साक्री नगर पंचायत नगराध्यक्षा सौ. जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापु गिते, पिंपळनेर अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, मा. जिप सदस्या सौ. लिलाबाई सुर्यवंशी आदींसह भाजपाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थाचे संचालक, सरपंच, सदस्य व सक्रीय कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments