Header Ads Widget

*शिंदखेडा येथील एस. एस. व्ही. पी. एस महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - 
       श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे  कै. शं. दे. पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य वाणिज्य  आणि  कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधत भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार एम. पाटील शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पी.आय दिपक पाटील उप प्राचार्य  डॉ. एस. व्ही. बोरसे उप प्राचार्य  डॉ. विशाल पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  एस. टी. राऊळ कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील प्रा. आर. के. पवार ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक प्रशांत जाधव      उपस्थित होते स्पर्धेला हिरवा झेंडा पी. आय. दिपक पाटील यांनी दाखवला.
      सदर स्पर्धेत  स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यात क्रमशः कुणाल ईश्वर सिंग गिरासे - प्रथम, - द्वितीय, कृष्णा गोरख कोळी - तृतीय, प्रेम रतिलाल बागले  तर मुलींमधून पुनम खंडू माळी प्रथम, मनीषा मनोहर बोरसे - द्वितीय, पूजा संजय पाटील  तृतीय क्रमांक पटकावला. मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेचच मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणही झाले. यावेळी विजेत्यांना रोख ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
     याप्रसंगी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार मल्हारराव पाटील यांनी ध्यानचंद यांच्या स्मृतींना उजाळा दिला व ध्यानचंद यांच्याप्रमाणे खेळाडूवृत्तीने खेळण्याचे व देशासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आव्हान केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी , क्रीडा संचालक राहुल पाटील,  महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments