दोंडाईचा-- प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी कधी ना कधी मरण पावतोच कुणीही अमर नाही आतापर्यंत कोट्यावधी माणसे या पृथ्वीवर जन्मली आणि मरणही पावली त्यांतल्या कोणाची साधे नावही आठवत नाही .मात्र , खानदेश विकासाचे महामेरू थोर स्वतंत्र सेनानी ,समाजसेवक उद्योगपती ,निष्ठावंत राजनेता आदर्श शेतकरी, महान शिक्षण सम्राट ,कामगारांचे आधारवड स्वर्गीय दादासाहेब रावल हे यांना अपवाद म्हणावे लागेल. १० सप्टेंबर 1924 रोजी स्वर्गीय दादा साहेब रावल यांच्या जन्म झाला.. दादासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण हे स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेत तर माध्यमिक शिक्षण हे प्रताप हायस्कूल मधुन घेतले पुढे त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजातुन कायद्याची डिग्री घेतली स्वातंत्र्यपूर्व काळात 1942 ' चले जाव' चळवळीत साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे सक्रिय सहभाग नोंदवला. शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना जोडधंद्याला चालना मिळावी म्हणून त्यांनी 1968 मध्ये शिंदखेडा तालुका दूध संघाची स्थापना केली. शिक्षणाच्या बाबतीत आपला जिल्हा पुढे असावा म्हणून त्यांनी 1953 साली खानदेशातील पहिली पॉलिटेक्निक कॉलेज धुळे येथे सुरू केली . 1954 साली मल्टीपर्पज हायस्कूल दोंडाईचा, बामणे , मालपुर येथे शाळा स्थापन केल्या. 1973 साली मका पिकावर प्रक्रिया करणारा उद्योग म्हणजे युनिव्हर्सल स्टार्च फिल्म ची स्थापना केली या उद्योगामुळे दोंडाईचा व परिसरातील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविला आज शिंदखेडा तालुक्यात शिक्षण , शेती , उद्योग आणि सहकार क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे जो काही विकास झाला आहे त्यात दादासाहेबांच्या मोलाचा वाटा आहे.. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून *माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल* हे त्यांच्या वारसा मोठ्या दिमाखीने व कष्टाने पुढे नेत आहेत. स्वर्गीय दादासाहेब रावल यांना विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏 *अण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments