*३२५ हुन अधिक रुग्णांची मोफत तपासणी*.
दाभाडी - मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे *एस.एम.बी.टी. हॉस्पिटल धामणगाव, राजधानी ड्रेसेस मालेगाव व अखिल भारतीय मराठा महासंघ दाभाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी महाआरोग्य तपासणी शिबिर दूध डेअरी
दाभाडीच्या प्रांगणात घेण्यात आले.* *शिबिराचे उद्घाटन दाभाडीचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम व राजधानी ड्रेसेस चे संचालक संजय जी फतनानी व उपसरपंच गब्बर दादा निकम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख
अतिथी म्हणून सुभाष नहिरे, डॉ. एस.के.पाटील, निळकंठ निकम, प्रकाश अहिरे, अंताजी निकम, गजानन निकम, पुनाजी निकम, नामदेव अहिरे, कारभारी निकम ,दीपक भावसार,उपस्थित होते.*
**या महाआरोग्य तपासणी शिबिरात सर्जन डॉ.आनंद चौधरी, बालरोगतज्ञ डॉ. गौरव पाटील, त्वचारोग तज्ञ डॉ.असद जावेद शहा, स्त्रीरोग तज्ञ डॉ.शिवानी पाटील, मेडिसिन तज्ञ डॉ.रौनिक सुतार, आरोग्य सेविका नीता वळवी, पुष्पा मुठे यांनी उपस्थित राहून जवळपास ३२५ हुन अधिक रुग्णांची तपासणी केली. यातील २५ हुन अधिक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.** *या शिबिरात उपस्थित सर्व रुग्णांचे मोफत शुगर, रक्तदाब, ब्लड, ऑक्सिजन व ईसीजी तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी
मराठा महासंघाचे *तालुकाध्यक्ष रावसाहेब निकम, दीपक निकम, पंडित देवरे, अजय निकम, अनिल निकम, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष घनश्याम निकम सनी निकम,योगेश देवरे, संतोष महाले, आकु निकम, दिपू निकम, दिनेश महाले, यश अहिरे ,पुरुषोत्तम निकम,अनिकेत निकम,दर्शन निकम, गौरव निकम,कल्पेश निकम अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी राजधानी ड्रेसेस चे स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा महासंघाचे उत्तर महा. विभागीय सरचिटणीस अमोल निकम यांनी केले तर आभार युवक अध्यक्ष उत्तर महा. मंगेश निकम यांनी मानले.*
0 Comments