शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - येथील गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिर व जनता हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी खमंग स्वादिष्ट पदार्थांचा आनंद मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याचे उद्घाटन संस्थेच्या सचिव श्रीमती मिरा मनोहर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी संस्था ज्येष्ठ संचालक श्री गोरख राघो पाटील संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील सचिव खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे प्राचार्य श्रीमती एस एस बैसाणे पर्यवेक्षक श्री उमेश देसले ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनवून आलेल्या खाद्यपदार्थांची खमंग चव मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी घेतली. आनंद मेळाव्यात भारतीय खाद्य संस्कृतीच्या परंपरेनुसार आनेक स्वादिष्ट पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेली होती. विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये देखील या मेळाव्याचा आनंद दिसून आला. कार्यक्रम सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार ए. टी पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एस ए पाटील सर, श्री एस के जाधव सर, श्री बी जे पाटील, श्री जे डी बोरसे, श्रीमती व्ही एस पाटील, श्रीमती एन जे देसले, श्रीमती पि यू पवार, श्रीमती ए पी बेहेरे, श्रीमती आर एच पाटील, श्रीमती पी ए पाटील, श्रीमती एस जे निकम सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले अतिशय उत्साही वातावरणात आनंद मेळावा संपन्न झाला.
0 Comments