वाहन खड्ड्यात अडकले. 22 जानेवारी रोजी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दोंडाईचा राममंदिर परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने जे जे हॉस्पिटल जवळ पाण्याच्या पाईप लाईन लिकेज असल्याकारणाने त्याला तात्काळ दुरुस्ती करण्यात आली होती पण दुरुस्ती केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्यात माती टाकण्यात आली होती. दोंडाईचेत श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या कार्यक्रम संपन्न झाला आणि दोंडाईचा नगरपालिकेला खड्डा पूर्ववत करायचा विसर पडला म्हणजे " काम सरो वैद्य मरो " अशी परिस्थिती आहे.दोंडाईचा नगरपालिकेला वरून आदेश आला तर लगेच दोंडाईचाचे नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी , आरोग्य कर्मचारी यांना कामाला लावायचे भलेही सर्वसामान्य माणसांच्या गल्लीतल्या गटारी तुंबलेल्या अवस्थेत असू द्या , रस्ते अस्वच्छ असतील ते चालतील पण आपले रेपोर्टेशन खराब व्हायला नको बघायला गेले तर मागील अडीच वर्षापासून दोंडाईचा नगरपालिकेवर प्रशासक बसले आहे पण ते नावालाचं. जे जे हॉस्पिटल मेन चौक हा रस्ता महत्त्वाचा असल्याने या आधीही किरकोळ स्वरूपाचे मोटरसायकल अपघात झाले आहेत. इच्छुक भावी नगरसेवक फक्त सफेद कपडे घालून राम राम शाम शाम करण्यासाठी आहेत यांना कल्पना आहे की आपला मालक दोन हजार रुपये मतदानाच्या आदल्या दिवशी देऊन यांना विकत घेऊ शकतो. जनताचं वेडी आहे चौकात येऊन चर्चा करून परिवर्तन घडत नसते परिवर्तन हे मतपेटीतून घडत असते. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments