जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री किशोर जी दराडे यांनी सदिच्छा भेट व शाळेला संगणक देत शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
कार्यक्रम प्रसंगी शिंदखेडा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष श्रीमती रजनीताई अनिल वानखेडे गटनेते श्री अनिल लालचंद वानखेडे ज्येष्ठ संचालक श्री गोरख राघो पाटील संस्थाअध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील सचिव श्रीमती मिरा मनोहर पाटील खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे,मा.उपनगराध्यक्ष श्री प्रकाश आप्पा देसले श्री भिला बारकू पाटील बिजेपी शहराध्यक्ष ऍडव्होकेट श्री विनोद पाटील नगरसेवक श्री उदय देसले सामाजिक कार्यकर्ते श्री दादा मराठे मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष श्री एस.ए.कदम प्राचार्य श्रीमती एस एस बैसाने पर्यवेक्षक श्री उमेश देसले वरिष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात माननीय आमदार श्री किशोर दराडे यांनी शिक्षकांना असणाऱ्या समस्या जाणून घेत मागील पाच वर्षात शिक्षकांसाठी केलेल्या कार्याचा आढावा मांडला.तसेच संस्थाअध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांनी शाळा चालवत असताना येणाऱ्या अडचणींचा शासनाने विचार करावा व शालेय व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी निधीची तरतूद व्हावी व शालेय विद्यार्थ्यांना राज्या बाहेर एस.टी. महामंडळाने सहलीची सवलत करून देत कर माफी द्यावी,अशी सर्व संस्थाचालकांच्या वतीने शासन दरबारी मागणी करण्यात यावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले.
0 Comments