शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - शिंदखेडा येथील साबरहट्टी, रज्जाक नगर, बंगला भिलाटी आधीच्या आदिवासी वस्तीला सिटीसर्वैला जमा भरुन हि नगरपंचायत प्रशासन का दुर्लक्ष करत आहे यासाठी आजपासून अन्यत्याग सत्याग्रह सुरु झाला आहे त्यात पुढील विषयावर मुख्य उद्देश असणार आहे.
*विषय* :1) शिंदखेडा जि. धुळे हद्दीतील पंतप्रधान घरकुल योजना करिता अतिक्रमण नियमाकुल करुन घरकुलाचा लाभ मिळणेबाबत...
2) शिदंखेडा शहरांतील गट क्रं 1215, बंगला भिलाटी व गट क्रं 2 नदी पार भिलाटी व रज्जाक नगर आणि 362 गट क्रं साबरहाटी भिलाटी जनता नगर
धुळे जिल्हयातील शिंदखेडा तालुक्यातील नगरपंचायत शिंदखेडा हद्दीतील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या- रज्जाक नगर नदीपार भिलाटी २) भुमापक क्रं. १२१५ (बंगला भिलाटी) मा. मुख्याधिकारी नगरपंचायत शिंदखेडा यांनी भुमापक भूमिअभिलेख कडे जमा भरलेली आहे.जमा भरुन जवळपास दोन वर्षाहुन अधिक काळ लोटला तरी तालुका भूमी अभिलेख उप अधीक्षक यांनी मोजमाप केलेली नाही. नगरपंचायतीच्या पत्रांकडे दुर्लक्ष केलेले आहे. आम्ही देखील आदिवासी काँग्रेस सेल व भिल समाज विकास मंचच्या माध्यमातून भूमी अभिलेख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला तरीही संबंधित कार्यालय आदिवासींचे अतिक्रमण नियमाकुल करीत नसल्याने घरकुलाचा लाभ मिळत नाही तरी आपणास नम्र निवदेनांद्वारे सदरील तालुका भूमि अभिलेख कार्यालयास आपल्या स्तरावर आदेशीत करून शिंदखेडा जि. धुळे येथील नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत येणाऱ्या रज्जाक नगर नदीपार गट 2 व भिलाटी व भुमापक क्र. १२१५ बंगला भिलाटीआणि 362 गट शबरहाटी भिलाटी जनता नगर येथील रहिवाशी आदिवासींना अतिक्रमण नियमाकुल करून मिळवून दयावा. श्री. दिपक दशरथ अहिरे, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस सेल, संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच म्हणून सुचित करित असुन सदरील विषय मार्गी लावावेत हयासाठी हे निवेदन अवलोकन करण्यासाठी दिलेले असुन वारंवार तक्रार व निवेदन देवुन ही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करित असल्याने *पाच फेब्रुवारी* पासून शिंदखेडा तहसिल कार्यालय समोर शहर व तालुक्यातील आदिवासी समाज महिला बांधवांसह अन्नत्याग सत्याग्रह करण्याचा इशारा दिला होता. हयाप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास भुमि अभिलेख विभागाचे अधिकारी व नगरपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहतील असे दिपक दशरथ अहिरे मा.नगरसेवक नगरपंचायत शिंदखेडा तथा जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस सेल तथा संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांसह पदाधिकाऱ्यांनी कळविले होते त्यानुसार आजपासून अन्यत्याग उपोषण सुरु केले आहे. आदिवासी बांधव महिला तिनशे चारशे संख्येने उपस्थित होते. हयावेळी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष शाम सनेर , माजी पंचायत समिती सभापती प्रा. सुरेश देसले, माजी नगराध्यक्ष दिपक देसले, मा.विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, शब्बीर पठाण, समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष डॉ. इंद्रिश कुरेशी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राहूल पाटोळे सह अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाठिंबा देऊन आदोंलन यशस्वी साठी शुभेच्छा देत जिल्हा क्रागेस पक्ष कधीही आदिवासी बांधव व महिला साठी उभा राहील असे सांगितले. हयाप्रंसगी आदिवासी क्राग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे सह अशोक सोनवणे, सुनील सोनवणे, गणेश सोनवणे, कालु मोरे, राजेश मालचे, जिभाऊ अहिरे, निर्मला बागुल, भुराबाई भिल जिजाबाई भिल, आक्का भिल, सालु भिल, कमल भिल , शानुबाई भिल, कल्पना भिल, सुनीता भिल, गनाबाई भिल, यासह शेकडो संख्येने आदिवासी बांधव व महिला सहभागी झाले आहेत.
0 Comments