राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धुळे शहरातील पहाटेचा दौरा पून्हा एकदा गाजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा) गटांचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जागीरदार यांनी अजित दादा पवार यांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे आपल्या धडाकेबाज कार्यपध्दतीने प्रसिध्द असलेल्या दादांनी इर्शादभाईना नाराज न करता शहरात रात्रीचा मुक्काम करुन पहाटेच इर्शाद जागीरदार यांच्या बोअरवेल उपक्रमाचे डिजिटल उद्घाटन केले.
या शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मागील संपूर्ण वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जागीरदार यांनी शहरातील विविध भागात शंभर बोअरवेल्स दिल्यात. अजित पवार यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधुन त्यांनी शंभर बोअरवेल्सची घोषणा केली होती. आणि मंदीर, असेल शाळा, असेल सामाजिक संस्था असेल, कॉलनी परिसर असेल, स्लम ऐरिया असेल अशा गरजू विभागात अतिशय चांगल्या पध्दतीने बोअरवेल्स, पाण्याची टाकी उभारुन आपल्या दमदार कामाला इर्शादभाई यांनी सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे या बोअरवेल्स देत असतांना कोणत्याही प्रकारचे श्रेय घेण्यासाठी इर्शाद भाई जागीरदार यांनी प्रसिध्दीचा हव्यास केला नाही. त्यांची विनम्र भूमिका ही शहरातील मतदारांच्या मनात घर निर्माण करणारी निश्चित आहे. परंतू त्यांचेकडे शहरातील विविध विभागातील नागरिकांनी पून्हा आपल्या भागात बोअरवेल्स करण्यासाठी अर्ज केलेले आहेत, मागणी केलेली आहे. त्यामुळे त्यांनी अजितदादा पवार यांच्या हस्ते पून्हा पन्नास बोअरवेल्सचे डिजिटल उदघाटन करुन आपल्या कार्याची झलक अजितदादांना दाखविली. यावेळी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाला दिलेली भेट देखील महत्वपूर्ण ठरली. याच दौर्यात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य किरण गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी अजितदादा पवार यांनी भेट दिली. यावेळी शहराचे दमदार नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे दोन वेळा निवडून आलेले आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीची अधिकृत माहिती बाहेर आली नसली तरी या भेटीमुळे जिल्हाभर चर्चेला उधाण आले आहे. त्या चर्चेच्या अनुषगांने विश्लेषण केल्यास येणार्या काळात जिल्हयातील राजकीय समिकरणे बदलेली दिसतील यात शंका नाही. राजवर्धन कदमंबाडे हे पवार कुटुबांशी एकनिष्ठ मानले जातात. पवार कुटुबांशी त्यांचे असलेले जिव्हाळयाचे नाते राज्याला परिचित आहे. शिवाय श्री कदमबांडे हे राजघराण्यातील असल्याने राज्यात त्यांना विशेष मानाचे स्थान आहे. परंतू मध्यतंरीच्या काळात आ. अमरीशभाई पटेल आणि राजवर्धन कदमंबाडे यांनी भाजपात प्रवेश केल्याने जिल्हयातील सर्वच राजकीय समिकरणे बदलली आहेत. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मातोश्री’ सोडल्याने आणि भाजपात दाखल होण्याच्या निर्णयाने पून्हा एकदा राज्यातील राजकीय समिकरणे बदलली. यात पून्हा अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या 42 आमदारासंह भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात आणि राज्यातील प्रत्येक मतदार संघात राजकीय समिकरणे बदलली आहेत. धुळे जिल्हा याला अपवाद नाही. आता नव्या बदलेल्या समिकरणात धुळे जिल्हयात पांच मतदारसंघातील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होतांना दिसते आहे. शिरपूर मतदारसंघ हा आ. अमरिशभाई यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिरपूर मतदारसंघात भाजपाचा उमेदवार असेल यांत कोणतीही शंका नाही. शिंदखेेडा मतदार संघात आ. जयकुमार रावल हे भाजपाचे उमेदवार असतील. या ठिकाणी ज्ञानेश्वर भामरे यांची राष्ट्रवादीची उमेदवारी अजित पवार भाजपात गेल्याने आपोआप बाद झाली. म्हणजे शिंदखेडयात ज्ञानेश्वर भामरे यांना भाजपाचा प्रचार करावा लागेल.धुळे ग्रामीणमध्ये भाजपाचाच उमेदवार असेल. परंतू उमेदवार म्हणून बाळासाहेब भदाणे, राम भदाणे, किंवा धरतीताई देवरे यापैकी कुणीही असू शकतो. म्हणजे पांच मतदार संघापैकी तीन मतदार संघात भाजपाचे अधिकृत उमेदवार असतील. साक्रीच्या विद्यमान आमदार मजुंळाताई गावीत या शिंदे गटात आहेत. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाने मागणी केलेली आहे. म्हणजे साक्रीची एक जागा ही शिंदे गटाला जाईल.उरलेली धुळे शहराची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाला मागीतली जाते आहे. शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे दोन वेळा या शहराचे आमदार होते, दहा वर्ष धुळे महानगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. त्यामुळे आता राजवर्धन कदमबांडे हे भाजपातून अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीत गेल्यास शहरातील राजकीय समिकरणे बदलतील असे आम्हाला वाटते. भाजपामहायुतीची जागा ही राष्ट्रवादी पक्षाला मिळेल अशी चर्चा अजितदादा व राजवर्धन कदमंबाडे यांच्या भेटीमुळे सुरु झाली आहे. कारण जिल्हयातील तीन जागा भाजपाला, एक जागा शिंदे गटाला, आणि एक जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळेल असे सूत्र जरी ठरले तरी त्यात चूकीचे असे काहीच नाही. उलट अनुप अग्रवाल यांनी राबविलेले उपक्रमामुळे त्यांचे मतदार, इर्शाद जागीरदार यांनी राबविलेले उपक्रम आणि जातीय मतदान, राजवर्धन कदमबांडे यांचे समर्थकांची मोठी फळी यामुळे शहराच्या जागेवर भाजपामहायुतीचा उमेदवारच निवडून येवू शकतो. त्यामुळे राजवर्धन कदमबांडे हे राष्ट्रवादी अजित दादा गटात गेल्याची चर्चा खरी ठरल्यास आणि त्यांना शहरातून महायुतीची उमेदवारी मिळाल्यास जिल्हयातील किमान चार जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी होतील अशी आमची विश्लेषणाची आकडेवारी सांगते. राजवर्धन कदमबांडे यांनी खुशाल अजितदादा गटात जावे असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.इर्शाद जागीरदार सुध्दा राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात.कारण विद्यमान एमआयएमचे आमदार यांना भाजपा राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचा महायुतीचा उमेदवारच लढत देऊ शकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे राजवर्धन कदमबांडे याच्या भेटीने? जी चर्चा सुरु झाली आहे ती प्रत्यक्षात उतरु शकेल. तुर्तास एव्हढेच.
0 Comments