Header Ads Widget

*पोलीस स्टेशन हे भूमाफियांचे जमिनीचे व्यवहार मिटविण्याचे केंद्र बनले?*



सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतो ते देखील कुठे, थेट पोलीस स्टेशन मध्ये, एक नव्हे तब्बल दहा गोळ्या चालविल्या जातात, त्या पण, कोणावर तर त्याच्याच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या शहर अध्यक्षावर गोळ्या झाडतो, तेही पोलीस स्टेशन मध्ये, हे कृत्य महाराष्ट्रात होतं, या वर आता विश्वास ठेवावा लागेल, एरवी आपण अशा कृत्याला जंगलराज म्हणत बिहारचे दाखले देतो, काही दिवसांनीं बिहार मध्ये महाराष्ट्राचे दाखले दिले जातील, अशी परिस्थिती आज होत असलेल्या राजकारणाने निर्माण झाली आहे.याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या जिल्हात आणि त्यांचेच सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील उल्हास नगर च्या हिल लाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली. अशी घटना महाराष्ट्रात होते या वर कोण विश्वास ठेवेल,! आता विश्वास ठेवावा लागेल, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्याई ने हे महाराष्ट्रात घडलं आहे. ज्यांना आपल्या जिल्हाची कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राची  कायदा सुव्यवस्था कशी राखणार? गोळीबार करणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत ते ऐकून आपण गल्लीतील टपोरी गुंड करत असलेल्या कारनामे तर ऐकत नाही ना! असा विचार सामान्य माणसाला पडू शकतो, असे जर पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर पुढे ह्या महाराष्ट्राचे काय होईल याची ग्यारंटी कोणी देऊ शकत नाही, स्वतः ला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीत भाजप चा आमदार पोलीसां देखत, पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार करतो 
या घटनेने मुख्यमंत्री बदनामी च्या फेऱ्यांत सापडले. पण ज्यांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखण्याची आहे असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुसंस्कृत चेहरा किती विद्रुप आहे हे या घटनेने सिद्ध झाले आहे.भाजपच्या आमदाराने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराने 
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचे अब्रुचे धिंडवडे निघाले
 आपण काय लायकीचे आहेत. ते या घटनेनं सिध्द झाले आहे. ८०च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्ड वर वर्चस्व कोणाचे या वरुन टोळी युद्धाने मुंबई हादरली होती. तशीच परिस्थिती आता भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तेतील वर्चस्वासाठी टोळीयुद्ध सुरू झाले आहे असे समजायला हरकत नाही. भाजप ने सागर बंगल्यावर दाऊद चा फोटो लावावा आणि शिवसेना शिंदे गटाने वर्षा बंगल्यावर अरुण गवळीचा फोटो लावावा, एवढेच तेवढे बाकी राहिले आहे.आप आपसातील भूमाफियांचे जमिनीचे व्यवहार पोलीस ठाण्यात  पोलिसांच्या मध्यस्थीने मिटविले जातात अशी चर्चा होती आता ती चर्चा खरी ठरली आहे,कारण उल्हास नगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात जो राडा झाला तो जमीनीचा वादावरून झाला,पोलीस ठाण्यात भूमाफियांचे जमिनीचे वाद पोलीसांच्या मध्यस्थींने मिटविले जातात हे या घटनेने सिद्ध झाले आहे,म्हणजेच शहरात होणाऱे अवैध धंद्याचे पैशावरुन होणारे वाद पोलीस ठाण्यात पोलिसांच्या मध्यस्थीने मिटविले जातात ? याची चर्चा दबक्या आवाजात या पुर्वी सुरू असायची, आता आ.गणपत गायकवाड ने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणाने दबक्या आवाजाची चर्चा  साऱ्या महाराष्ट्राला कळाले तर आहेच, त्याचबरोबर भाजप सेना शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी काय धंदे करतात हे सर्वांना कळाले आहे ,नाकाने कांदे सोलण्याऱ्यांचे  आ.गणपत गायकवाडांनी भर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराने नाक कापले गेले. या घटनेने भाजप आणि शिवसेना यांना अब्रू आहे का? या वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे? दुसऱ्याचे वाकून बघण्या पेक्षा आपल्या बुडा खाली काय जळते, हे भाजप सेना वाल्यांनी पहावे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या वर, गंभीर स्वरुपाचे,आय पी सी ३७९,३८०,३४,१२०बी,४२७,१६०,१८८,११४ असे एकुण १८गुन्हे  पोलीस ठाण्यात दाखल आहेत,हे भाजप च्या आमदारांचे कतृत्व आहे. तसेच ज्यांच्या वर गोळ्या चालविल्या, तो शिंदे गटाचा महेश गायकवाड यांची ही पाश्र्वभूमी गुन्हेगारीची आहे.!
  🌸 अरुण पाटील 🌸
        

Post a Comment

0 Comments