Header Ads Widget

*मी शेतकऱ्यांचा मित्र त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न बिंदूशेठ शर्मा*



-----------------------------शिंदखेडा ( यादवराव सावंत प्रतिनिधी ) मी शेतकऱ्यांचा मित्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच माझा प्रयत्न शेतकरी किसान सेलचे प्रांतिक अध्यक्ष बिंदूशेठ शर्मा यांनी स्पष्ट केले 
     सविस्तर माहिती अशी की दिनांक दोन फेब्रुवारी रोजी शिंदखेडा येथील पाटण चौफुली येथे प्रकाश चौधरी यांच्या टिव्हीएस शोरूम ला व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघटना कार्यालयाचे उदघाटन बिंदूशेठ शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाले प्रसंगी नगरपंचायत मा गटनेते अनिल वानखेडे रावसाहेब मा नगरसेवक उदय देसले उल्हास देशमुख अरुण देसले एडव्होकेट विनोद पाटील एडव्होकेट वसंतराव पवार धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ब्यांकेचे संचालक प्रकाश पाटील पस सदस्य राजेंद्र देवरे शिंदखेडा एज्युकेशन चे संचालक आधार पवार सोसायटी चेअरमन युवराज माळी प्रकाश चौधरी प्रा सुरेश देसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप दीक्षित यांनी केले
     दरम्यान पत्रकारिता व परखड पत्रकारिता या बाबत तर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न याबाबत प्रकाश पाटील व आधार पवार यांनी मनोगत व्यक्त केले 
     बिंदूशेठ शर्मा यांनी मनोगत म्हटले की मी शेतकरी पुत्र असून मला शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची जाणीव आहे त्यात कांदा उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक यासह इतर कडधान्य उत्पादक शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे एवढेच नाहीतर पीक विमा कर्जमाफी योजन यतातर मोठ्या अडचणी आहेत कर्ज वसुलीसाठी ब्यांक शेतकऱ्यांची ब्यांक खाती होल्डवर ठेवतात त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही तर पीकविमा कंपन्या अडवणूक करतात यासाठी शिंदखेडा सह सर्व कृषी खात्यात जाऊन मी माहिती घेतो व त्याचा वरपर्यंत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देत आहेत्यांच्या पाठपुराव्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील सिंचन विहिरी पीक विमा प्रश्न मार्गी लागला हे विशेष आहे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे उमेदवारी करण्याबाबत बिंदूशेठ शर्मा इच्छुक असून ते प्रयत्नशील आहेत संपूर्ण मतदारसंघात त्यांचा संपर्क सुरू असून कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी बोलतांना व्यक्त केला  कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रा प्रदीप दीक्षित कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील उपाध्यक्ष राका पवार यासह महेश गुजराथी आर ओ पाटील प्रा भैय्या मंगळे प्रकाश चौधरी अशोक गिरनार आसिफ  पठाण अखतर शहा सचिन पाटील रवींद्र पाटील भूषण मराठे ,जितेंद्र मेखे प्रा अजय बोरदे दीपक चौधरी संजय महाजन महेंद्र मराठे आदी पत्रकार उपस्थित होते तर उपस्थितांमध्ये एम एच एस एस हाय व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य टी एन पाटील उर्दू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के बी अहिरराव माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील शेतकरी बोर्डिंग शिक्षण संस्थेचे चेअरमन साहेबराव खरकार  यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते झाले आभार प्रदर्शन संजय महाजन यांनी केले

Post a Comment

0 Comments