Header Ads Widget

*रोजगार हमी योजना अंतर्गत व्यक्तिगत विहिरींना मंजुरी मिळावी यासाठी गटविकास अधिकारी यांना शिंदखेडा तालुका काँग्रेस सेवा दलाचे निवेदन*





शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - शिंदखेडा तालुका काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष पंकज निकम यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनाद्वारे शिंदखेडा
तालुक्यातील २० गावाना अद्यापही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक विहिरींना मंजुरी मिळाली नाही सदर अशंत शोषित पाणलोट क्षेत्रात, वीस गावांना जोडण्यात आलेले दिसत आहे, ज्या २० गावांना भूजल क्षेत्रात येतात त्या गावातील बहुतेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा हा विहिरीवरच होत आहे त्यामुळे पूर्वी केलेला भूजल सर्वेक्षण हा काल बाह्य झाला आहे का?
आपल्या दरबारी शेतकऱ्यांनी सन २०१८-१९ पासून अर्ज दाखल केले आहेत त्यांनाही अद्याप मंजुरी मिळाली नाही आणि आजची परिस्थिती भूजल सर्वेच्या आड लपाछपीचा खेळ दिसत आहे वीस गावातील या योजनेपासून वंचित राहू नाही, आपण आपल्या स्तरावर शेतक-यांची काळजी घ्यावी अशी विनंती दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. हयावेळी शिंदखेडा तालुका काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष पंकज गुलाबराव निकम ,
प्रभाकर साहेबराव निकम,
अशोक लोटन निकम,
 संजय सूर्यवंशी ,
शिवदास  सूर्यवंशी ,
चंद्रकिरण  निकम , भरत  निकम धनशाम सोनवणे, जितेंद्र निकम ,विजय ठाकरे, बारकु सोनवणे, भाऊसाहेब निकम, कैलास पाटील, जितेंद्र सुभाष निकम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments