Header Ads Widget

वसंतराव काणे, रंगा अण्णा वैद्य आदर्श तालुका, जिल्हा संघ पुरस्कारासाठी जिल्हा व तालुका संघांनी प्रवेशिका पाठवाव्यात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संलग्न जिल्हा, तालुका संघांना आवाहन



मुंबई :  मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ 2024 साठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.. महाराष्ट्रात अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ खरोखरच उत्तम काम करतात मात्र त्यांचं हे कार्य राज्य पातळीपर्यंत पोहचत नाही ही बाब लक्षात घेऊनच मराठी पत्रकार परिषदेने गेल्या दहा वर्षांपासून सर्वोत्तम कार्य करणाऱ्या संलग्न  जिल्हा आणि तालुका संघांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याची योजना सुरू केली आहे.. पुरस्कार वितरणाचे हे सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात घेण्यात येतात.. गेल्यावर्षी हा सोहळा माहूर येथे पार पडला होता.. यावर्षीच्या सोहळ्याची तारीख आणि स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल.. प्रवेशिका पाठवताना जिल्हा किंवा तालुका संघानं केलेल्या कार्याची कात्रणं, फोटो तसेच परिषदेच्या उपक्रमातील सहभाग, आर्थिक पारदर्शकता, संघाच्या निवडणुका वेळेवर होतात की नाही याची माहिती पाठवावी लागेल.. आपल्या प्रवेशिका उशिरात उशिरा 20 डिसेंबर 2024 पुर्वी परिषदेचे सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे (98500 33555) यांच्याकडे पाठवाव्यात असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे..

 


Post a Comment

0 Comments