Header Ads Widget

*विधानसभा झाली आता वेध नगरपालिकेचे* *दोडाईंचा नगरपालिकेत भाजपकडून तेच उमेदवार असतील का नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल ?* *प्रतिस्पर्धी देशमुख गट ताकदीने लढेल का हे पहाणे औत्सुक्याचे*




दोडाईंचा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दोडाईंचा शिंदखेडा मतदारसंघात जयकुमार भाऊ रावल यांनी विरोधकांना चारी मुंड्या चितपट करत विक्रमी मतधिक्य मिळवत पाचव्यांदा आमदारकीचा बहुमान मिळवला महायुतीचे व महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपापल्या उमेदवाराचा प्रचार केला यामागे अपेक्षा होती आगामी नगरपालीका निवडणूकीत उमेदवारीसाठी आपला विचार व्हावा , या मानसिकतेची.त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या भागातील केंद्रावर अधिकाधिक मतदान होईल या दृष्टीने प्रयत्न करत होता या सर्वांचे लक्ष आता दोडाईंचा नगरपालिका निवडणूककडे आहे.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका मागील साडेतीन वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत यात  ओबीसी आरक्षण , न्यायप्रविष्ट मुद्दा कोविड प्रतिबंधक नियम आणि अडीच वर्षे पूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडी आदी कारणांमुळे वेळोवेळी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.
सुत्रांच्या माहिती नुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जातयं त्यामुळे राज्यात  लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

  कदाचित महायुतीचे सरकार मधे धुळे जिल्ह्यातील भाजपच्या कोट्यातून मा.जयकुमार रावल यांची कॅबिनेट मंत्रीपदी देखील वर्णी लागू शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोडाईंचा नगरपालिकेची 27 नोव्हेंबर 2016 ला 24 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यात तात्काळीन कॅबिनेट मंत्री मा.जयकुमार रावल यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या नगरपालिकेत भाजपचे 21 माजी मंत्री डॉ. हेंमत देशमुख यांचा कांग्रसचे 2 व मनसेला 1 असे 24 नगरसेवक निवडून आले होते.त्यावेळी जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले होते व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी नयनकुवर रावल निवडून आल्या होत्या यावर्षी प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या ही 24 वरून 27 जाण्याची शक्यता आहे.लवकरच महाराष्ट्रात महायुती सत्तारूढ झाल्यावर न्यायप्रविष्ठ असलेला ओबीसी आरक्षणाच्या मार्ग लवकर मोकळा होईल व फेब्रुवारी मार्च महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील असे राजकीय जाणकार बोलत आहेत. 

2016 दोडाईंचा नगरपालिकेत मा.जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भाजपचे तब्बल 20 नगरसेवक निवडून आले होते त्यात बरेचसे नवख्या चेहऱ्यांना जयकुमार रावल यांनी संधी दिली होती ते जयकुमार रावलांचा करिष्माने कर्तुत्व नसतांना निवडून आले ते आजही दोडाईंचेतील जनतेसाठी नवखेच आहेत केवळ त्यांचा आई वडिलांचा नावारूपी पुण्याईने व आर्थिक पाठबळ मजबूत असल्याने त्यांना टिकीट दिले होते परंतु यावेळी पुर्वीपेक्षा अधिक मजबूत असणारे मा.जयकुमार रावल कोणाला संधी देतात हे बघण्याचे औत्सुक्याचे असेल 

दुसरीकडे देशमुख गट किती ताकदीने लढेल हे आत्ताच सांगणे चुकीचे होईल परंतु राजकीय विश्लेषक सांगतात 2016 मधे ऐनवेळेस लोंबकळत असलेल्या विद्यूत तारे सारखी परिस्थिती ही देशमुख गटाची झाली होती आता त्या लोंबकळत असलेल्या तारा सरळ होतील का ? का पुन्हा 2016 प्रमाणेच एकहाती वर्चस्व अबाधित राखण्यास जयकुमार रावर यांना यश येईल घोडे मैदान दुर नाही लवकरच त्याची प्रचिती दोडाईंचेतील नागरिकांना येईल 

 *आण्णा कोळी महादेवपुरा दोडाईंचा*

Post a Comment

0 Comments