शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
26 नोव्हेंबर 2024 रोजी गणेश हायस्कूल शेवाडे या शाळेत संविधान दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री ए .के. अमृतसागर सर यांनी धुरा सांभाळली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक श्री एस .पी. पाटील सर यांनी संविधान दिनाचे महत्त्व व बाबासाहेबांचे राजकीय व सामाजिक कार्य याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन संविधान दिन व बाबासाहेबांचे कार्य याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय देशमुख सर यांनी 26. 11. 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. व अध्यक्ष भाषण मध्ये आदरणीय अमृतसागर सरांनी कार्यक्रमाविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. श्रीयुत के. वाय. चौधरी सर यांनी आभार व्यक्त करून अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. शेवटी विद्यार्थ्यांना पोषण आहारात मिष्टान्न देऊन कार्यक्रम गोड करण्यात आला.व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
0 Comments