Header Ads Widget

*शिंदखेडा पोलीस ठाण्यात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन*




शिंदखेडा प्रतिनिधी - येथील पोलीस ठाण्यात पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात सह पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा कार्यावर विचार मंथन केले. फुले यांनी महिला व मुलींचे शिक्षण ,शेती सुधारणा, विधवा व अस्पृश्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य तसेच जातीव्यवस्थेचे उच्चाटन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड,हेड कॉन्स्टेबल आनंत पवार,पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सोनवणे,महिला गटाचे जिल्हाअध्यक्षा सौ.शोभा पाटील,सदस्य सौ.आरती मोरे,सौ.संगीता गिरासे,सदस्य लखेसिंह गिरासे,पत्रकार संजय कुमार महाजन,भूषण पवार व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments