Header Ads Widget

*भिल समाज विकास मंच बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे शिंदखेडा शहरात 13 आगस्ट ला भव्य परिवर्तन सभा* *समाजात परिवर्तनाची गरज मोठ्या संख्येने उपस्थित राहा - दिपक अहिरे*

                  
   शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
 शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा शहरात येथे सालाबादा प्रमाणे यंदाही ९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसा निमित्त १३ ऑगस्ट रोजी भव्य परिवर्तन सभेचे आयोजन करण्यांत आले आहे.सदर सभेत आदिवासी समाजाला विशेष म्हणजे नवतरुणाना नाच गाणे धांगडधिंगा एवजी परिवर्तनाची गरज असल्याचे मत व्यक्त करित विविध विचाराची देवाणघेवाण होणार असुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी केले आहे. सदर परिवर्तन सभेत खालिल विषयावर चर्चा होणार असुन त्यात १) जल, जंगल, जमीन, स्वावलंबन, स्वाभिमान. २) शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्त व संघटन. ३) अतिक्रमणाच्या नावांवर आदिवासी समाजाला जमिनी व घरापासून बेदखल करण्याचे षडयंत्र महाराष्ट्र सरकारचे सुरु आहे. ४) राजकीय व सामाजिक भागिदारी व नेतृत्व ५) परंपरा, संस्कृती, बोलीभाषा, इ. विषयांवर चर्चा करण्यात येईल. परिवर्तन सभेमध्ये शाहु, फुले, आंबेडकर, चळवळीचे समविचारी राजकीय नेते
मंडळी जिवाभावाचे सर्व जाती धमार्च मित्र परिवार १३ ऑगस्ट रोजी परिवर्तन सभेमध्ये हजर राहुन सभेची शोभा वाढवावी असेही हयावेळी सांगितले.नियोजित संस्थापक खजिनदार राजेश आनंदा मालचे हे परिवर्तन सभेचे अध्यक्ष असणार आहेत. भिल समाज विकास मंच बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, शिंदखेडा जि. धुळे द्वारा आयोजित सर्व संस्थापक सदस्य व पदाधिकारी आणि समस्त कार्यकर्ते सह आदिवासी संस्कृतीचा देखाव्याची सांस्कृतिक परिवर्तन रॅलीची सुरुवात सकाळी १० वा. बंगला भिलाटी वरपाडा रोड, स्टेशन रोड, बस स्टॅण्ड, भगवा चौक मार्गे बिजासनी मंगल कार्यालय सभेचे ठिकाण सकाळी ११ वा. बिजासनी मंगल कार्यालय स्टेशन रोड, शिंदखेडा येथे येणार असुन विचाराची परिवर्तन सभा होईल. हयावेळी आदिवासी समाज विकास मंच शिंदखेडा, धुळे जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस विभाग व मोठ्या संख्येने समाज बांधवांनी शिंदखेडा येथे उपस्थित रहावे.असे आयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments