Header Ads Widget

*शिंदखेडा तालुकास्तरीय आखिल भारतीय विध्यार्थी विज्ञान मेळाव्यात जनता हायस्कूलचा कृष्णा चांभार प्रथम.*

    शिंदखेडा पंचायत समिती (शिक्षण ),शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ व शिंदखेडा तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन अँग्लो उर्दू हायस्कूल दोंडाईचा येथे करण्यात आले होते.
  सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सौ वैशाली बच्छाव  उपस्थित होते,  कार्यक्रम प्रसंगी तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री.आर.ए  चित्ते कार्याध्यक्ष श्री जे.डी  भदाणे पत्रकार श्री जितेंद्र सिंह गिरासे,श्रीमती वाहिदा खान, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शफिक काजी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
   या तालुकास्तरीय विध्यार्थी विज्ञान मेळाव्याला शिंदखेडा तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. यात  जनता हायस्कूल चा विद्यार्थी कृष्णा कैलास चांभार प्रथम तर कु.लावण्या मिलिंद पाटील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय  पाष्टे हिने द्वितीय क्रमांक पटकवला. तसेच आर एम आर गर्ल्स हायस्कूल दोंडाईचा ची विद्यार्थिनी राजनंदनी रवींद्र पवार हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. 
 प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली आहे.
   या वर्षासाठी क्वांटम युगाची सुरुवात शक्यता व आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांनी सखोल अशी माहिती आपल्या वकृत्वातून करून दिली.    
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवींद्र चित्ते सर, अध्यक्ष तालुका विज्ञान संघ यांनी तर सूत्रसंचालन श्री अतुल टी पाटील यांनी केले मान्यवरांचे आभार श्री जे. डी. भदाणे यांनी मानले.सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. पी.बी.विसपुते श्री. श्री जे डी भदाणे, श्री ए टी पाटील यांनी काम पाहिले                           कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments