धुळे- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय देवपूर, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड. मेघराज राजेंद्र नालंदे (अकुलखेडेकर) यांची महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या बारामती शाखेच्या सचिवपदी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट प्रविण नलवडे, पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. कल्याण शिंदे यांच्या सुचनेनुसार ही निवड झाली. ॲड. मेघराज नालंदे हे गेल्या 13 वर्षापासून बारामती येथे वकिली व्यवसाय करीत आहेत. यापूर्वी त्यांनी बारामती बार असोसिएशनच्या खजिनदार पदी झालेल्या निवडणुकीत बहुमताने विजयी होऊन जबाबदारी सांभाळली होती. सचिवपदाचे नियुक्ती पत्र स्विकारताना आपण नोटरी वकीलांच्या अडीअडचणी सोडवून संघटनेचे काम करीत असतांना पूर्वीच्या अनुभवातून शासनदरबारी पाठपुरावा करून पदास योग्य न्याय मिळवून देण्याची हमी दिली. त्यांच्या नियुक्तीचे पुणे जिल्हा परिसर व खान्देशातील परिचितांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे. ॲड. मेघराज नालंदे यांचे महाविद्यालयीन शिक्षण विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे, देवपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मधून विधी पदवी घेतली तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातून वृत्तपत्र विद्या प्रमाणपत्र पदवी संपादन केली आहे. ते ज्येष्ठ पत्रकार गो. पि. लांडगे यांचे भाचे आहेत.
0 Comments