दिनांक ०१/०८/२०२५ वार शुक्रवार
सुजाण नागरिक प्रतिनिधी श्री.सी.जी.वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब श्री एस एम कदम सर होते यांच्या हस्ते भारतीय असंतोषाचे जनक, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व थोर समाजसेवक लोकमान्य टिळक व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोघा महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयातील इयत्ता ५वी ते १०वीपर्यंतच्या २५ विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला होता,तद्नंतर विद्यालयातील शिक्षकांनीही लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केलेत.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम सर यांनी एकीकडे उदय आणि दुसरीकडे अस्त या शब्दांनी साहित्य रत्न शाहीर अण्णाभाऊ साठे व भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या विषयीचे मर्म पटवून दिले की, लोकमान्य टिळक-गोपाळ गणेश आगरकर-मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिन्ही विचारप्रवर्तकांच्या मनात एकच प्रश्न समोर होता की, आमच्या देशाचा इतिहास इतका संपन्न,आमची संस्कृती इतकी महान मग आज आम्ही परकीयांचे गुलाम का?आमचा समाज मागे का? मग भारताला या निकृष्ट अवस्थेतून बाहेर कसं काढता येईल?या प्रश्नांची उत्तरे मिळाली ते म्हणजे आपल्या लोकांचं "अज्ञान" दूर केल्याशिवाय आपल्या समाजाची प्रगती होणार नाही त्यासाठी लोकांना शिक्षण दिले पाहिजे व चिपळूणकर म्हणत की,"आमच्या देशाला काही झालेले नाही आणि त्याची नाडी अगदी साफ आहे!व त्यांना इंग्रजांची सत्ता मुळीच मान्य नव्हती पाश्चात्य विद्येबद्दल मात्र आदर होता त्या विद्येतील वैज्ञानिकदृष्टी, तंत्रज्ञान, स्वातंत्र्य इ.विचारांनी प्रभावित झाले होते म्हणून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज काढली.
तसेच शाहीर अण्णासाहेब साठे एक मराठी समाज सुधारक, लोककवी वा लेखक होते एका अस्पृश्य मातंग समाजामध्ये जन्मलेले अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले नंतर सर्वजणांद्वारे होणाऱ्या भेदभावमुळे त्यांनी शाळा सोडून दिले व त्यांना गायन कलेचा छंद होता त्यातून त्यांनी विविध साहित्य त्यात-
३५कादंबऱ्या,१३लोकनाट्य,
०३ नाटके,१३कथासंग्रह,
०१प्रवास वर्णन, ०७चित्रपट कथा व पोवाडे इत्यादी साहित्य उदयास आले.इत्यादीविषयी महत्त्व पटवून देताना आपल्याच गावातील न शिकलेले व खान्देशातील नामवंत शाहीर कै.नामदेवराव बापूजी यांच्या कलेविषयी दाखला दिला तसेच वेशमुक्ती, प्राणी मात्रावर दया करा, पर्यावरण संवर्धन,शारीरिक,बौद्धिक,भावनिक, शैक्षणिक,सांस्कृतिक इ. विकासात्मकतेविषयीचे महत्त्व पटवून दिलेत.
यावेळी कार्यक्रमास आदरणीय मुख्याध्यापक,शिक्षक -शिक्षकेत्तर बंधू -भगिनी कर्मचारी वृंद,व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते व
सुत्रसंचलन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार -श्री.पी.आर.पाटील सर यांनी मानलेत.
0 Comments