शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिरात भारत स्वातंत्र्य लढ्यातील जहाल मतवादी नेते लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने शालेय स्तरावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य श्रीमती एस एस पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील,श्री डी एच सोनवणे,श्रीमती एन जे देसले वरिष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय स्तरावर वकृत्व स्पर्धेत पहिली ते चौथी बालगटातून प्रथम केतन परदेशी, द्वितीय वेदांत सूर्यवंशी, तर तृतीय कामरान तांबोळी यांना तर पाचवी या स्वतंत्र गटातून प्रथम हर्षद शेख, द्वितीय प्रथमेश एकनाथ सोनवणे, तृतीय खुशी मनोहर सिसोदे,यांना तर सहावी ते आठवीच्या मध्यम गटातून प्रथम कृष्णा ललित चांभार, द्वितीय प्रशांत प्रकाश चौधरी, तर तृतीय निशा अविनाश पाटील, तसेच नववी व दहावीच्या मोठ्या गटातून प्रथम हर्षाली प्रवीण माळी, द्वितीय मेघा नरेंद्र भावसार, यांनी अनुक्रमे मिळवले.श्री ए टी पाटील, श्रीमती व्ही एच पाटील,श्रीमती आर ए पाटील,यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात येणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री जे डी बोरसे यांनी मानले.
0 Comments