आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील श्रीराम नगर भागात काल (सोमवार, दि. १७/११/२०२५) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे चुनीलाल पंढरीनाथ माळी (भैया मिस्तरी) यांच्या घराला आग लागली. या दुर्घटनेत माळी कुटुंबाचे संपूर्ण घरगुती साहित्य जळून खाक झाले असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे
दुपारी १:३० वाजताच्या सुमारास माळी यांच्या घरात अचानक विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली काही क्षणातच आगीने मोठे स्वरूप धारण केले घरातील वस्तू बाहेर काढायला कुटुंबाला कोणताही वेळ मिळाला नाही.
या दुर्घटनेत घरातील अन्नधान्य, फ्रिज, कुलर, टीव्ही, पंखे,कपडे, बेडिंग, भांडी तसेच इतर सर्व जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे जळून नष्ट झाल्या. माळी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांचे संपूर्ण जीवनोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाल्याने ते निराधार झाले आहेत
घरातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशांनी त्वरित पाऊले उचलत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अचानक आलेल्या संकटामुळे माळी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
ग्रामस्थांनी या गरीब कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात पुढे करून त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी साहाय्य करावे, अशी कळकळीची मागणी होत आहे.
0 Comments